loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना नेते रामदासभाई कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भरणे येथे भव्य महाआरोग्य शिबिर; सुमारे ५०० नागरिकांनी घेतला लाभ

खेड, (दिलीप देवळेकर) : शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आषाढी एकादशीचे औचित्य साधून दि. २५ जुलै २०२६ रोजी भरणे वारकरी संप्रदाय मठ येथे वारकरी व नागरिकांसाठी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत सुमारे ४५० ते ५०० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य व खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्या मानसीताई जगदाळे व रेवतीताई पाटील, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, भरणे सरपंच संतोष गोवळकर, श्रीदेवी काळकाई मंदिर समितीचे अध्यक्ष महेश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्या प्रभावती भुवड व जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतिश चिकणे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, युवासेना शहर प्रमुख दरेकर, महिला संघटिका नेहा दळी यांनी महाआरोग्य शिबिराला उपस्थिती दर्शवली. यावेळी जेसीआय खेडचे अध्यक्ष अमित नामुष्ट्ये, माजी अध्यक्ष अमर दळवी, पराग पाटणे, दीपक नलावडे, प्रमोद कांबळे, आनंद कोळेकर, अमोल क्षीरसागर, फाउंडर मेंबर डॉ. शामप्रसाद गिल्डा, डॉ. पवार, डॉ. सौरभ पेंडसे, गणेश खेडेकर, सचिव मधुर पेठे, तसेच लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी, माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भरणे वारकरी संप्रदाय मठाचे येसरे महाराज, जाधव, उपाध्यक्ष मोरे, सावंत तसेच असंख्य वारकरी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

टाइम्स स्पेशल

या शिबिरासाठी बाई रतनाबाई घरडा हॉस्पिटल, यश मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, आय केअर सेंटर आदी नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला. शिबिरात ब्लड शुगर, हिमोग्लोबिन, रक्तदाब, ऑक्सिजन लेव्हल (SpO₂), डोळ्यांची तपासणी, दंत तपासणी, ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वजन व BMI, नाडी तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आहार व जीवनशैली मार्गदर्शन, मोफत आरोग्य सल्ला तसेच उपलब्धतेनुसार मोफत औषध वितरण अशा विविध सेवा देण्यात आल्या. शिबिराच्या नियोजनापासून ते यशस्वी अंमलबजावणीपर्यंत श्री अमित कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हे महाआरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg