loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्राचे शाहिर शंकर भारदे गुरूजी यांचा पंढरपुरात होणार सत्कार

दापोली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे शाहिर व दापोलीत टेटवली गावचे सुपुत्र महाराष्ट्र गौरव भूषण शाहिर शंकर भारदे गुरूजी यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून सदरचा पुरस्कार 15 ऑगस्ट 2026 रोजी पंढरपुर येथील विठ्ठल मंदिरात श्री संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास यांचे हस्ते वितरीत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाहिर भारदे यांची पाचशेहून अधीक गाणी सध्या महाराष्ट्रात गाजत आहेत. विशेषता पांडुरंगावर काढलेली भक्तीगीते व आई वडील यांचे महत्त्व सांगणारी गाणी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर प्रचंड व्हायरल झाली आहेत. महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच किर्तनकार आपल्या किर्तनात प्रमाण म्हणून भारदे गुरूजीचीच गाणी घेतात.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन श्री क्षेत्र पंढरपुर नामयज्ञ ट्रस्ट यांनी हा पुरस्कार जाहीर केला असून पंढरपुरसारख्या पावन भूमित आपल्या गुरूवर्यांचा सन्मान होत आहे. त्या गुरूजींचे हजारो शिष्य व चहाते यांना खूप आनंद झाला असून त्यानी या ट्रस्टला धन्यवाद दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg