loader
Breaking News
Breaking News
Foto

१६ ऑगस्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा; संगमेश्वर तालुका कुंभार समाजाचा उपक्रम

संगमेश्वर(प्रतिनिधी)- संगमेश्वर तालुका कुंभार समाज व युवा आघाडी संगमेश्वर यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक १६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री वीरोबा मंदिर कसबा फणसवणे कुंभारवाडी या ठिकाणी १६ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यामध्ये इयत्ता चौथी, पाचवी, सातवी ,आठवी स्कॉलरशिप तसेच इयत्ता दहावी बारावी चे नैपुण्य प्राप्त विद्यार्थी तसेच काही विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संगमेश्वर तालुका युवा आघाडी अध्यक्ष प्रथमेश साळवी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा सोहळा कुंभार समाजाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून जिल्ह्यातील विविध मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थिती लावणार आहेत. याच तालुका मेळाव्यामध्ये संगमेश्वर तालुका कुंभार समाजाची तालुका कार्यकारणी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील इच्छुक समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा मार्गदर्शक तसेच रत्नागिरी जिल्हा युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज जिल्हा संघटक निलेश कुंभार यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg