loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर - वरचापाट येथील श्री दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर वरचापाट येथील श्री दत्त मंदिर येथे बुधवार दि.२९ जुलै २०२६ रोजी गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त श्री दत्त पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्त मंदिरामध्ये दरवर्षी श्री दत्त जयंती उत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव व इतर उत्सव मोठ्या उत्साहामध्ये तसेच विविध कार्यक्रमानी साजरे करण्यात येतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दर गुरुवारी श्री दत्त मंदिर मध्ये दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. एकंदरीत या दत्त मंदिरमध्ये भाविकांची नेहमीच गर्दी दिसून येते. हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान असून दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तगणांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त मंदिर देवस्थान गुहागर वरचापाट अध्यक्ष दत्तात्रय शेटे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg