loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी तलाठी कार्यालयाजवळ ग्रामपंचायतीच्या सूचनाफलकाखालीच कचऱ्याचे साम्राज्य

साटेली भेडशी - दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील तलाठी कार्यालयाजवळ ग्रामपंचायतीने "उघड्यावर कचरा टाकू नये, अन्यथा कारवाई केली जाईल," असा इशारा देणारा फलक उभारला आहे. मात्र, या फलकाच्या अगदी समोर आणि आजूबाजूला प्लास्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या, घरगुती टाकाऊ वस्तू तसेच ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त पडलेला दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामपंचायतीने कारवाईचा इशारा देणारा फलक लावूनही काही नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत उघड्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती वाढण्याची तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक सुजाण नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, केवळ इशारे देणारे फलक लावून न थांबता उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई करावी, कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावावी आणि तलाठी कार्यालय परिसर तातडीने स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg