loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक वनीकरण विभाग, देवरुख व माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे वृक्षारोपण सोहळा उत्साहात

संगमेश्वर (प्रतिनिधी) - "वन महोत्सव, अमृत वृक्ष आपल्या दारी आणि एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभाग, देवरुख व माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, संचालक विक्रांत दरडे, वन परिमंडलाचे वनपाल अरुण माळी व संयोग कराडे, पोलीस पाटील अनंत जोशी, आकाश कडूकर, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष शेखर गुरव, तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक वनीकरण विभागाने "एक विद्यार्थी – एक झाड" या संकल्पनेतून प्रशालेसाठी तब्बल २०० फळझाडांची रोपे उपलब्ध करून दिली. आवळा, आंबा, काजू, जांभूळ, सिताफळ यांसारख्या उपयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांचा यात समावेश आहे. ही झाडे केवळ शाळेचा परिसर हिरवागार करणार नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवतील. कार्यक्रमादरम्यान सामाजिक वनीकरण विभागाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल वन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एक महत्त्वपूर्ण निर्णय संस्थेच्यावतीने जाहीर करण्यात आला. प्रशालेत दरवर्षी "निसर्ग मित्र पुरस्कार" देऊन वृक्षांचे उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले. या पुरस्कारांतर्गत विजेत्या विद्यार्थ्यास सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि ₹५०१ रोख पारितोषिक प्रदान केले जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. हा पुरस्कार संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे व उपाध्यक्ष डॉ. अभिमन्यू शिंदे यांनी पुरस्कृत केला आहे.

टाईम्स स्पेशल

संचालक विक्रांत दरडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. वृक्ष लागवड ही केवळ एक दिवसाची कृती नसून, त्यांचे संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन केले, तर भविष्यात परिसर अधिक हिरवा, स्वच्छ आणि निरोगी होईल. अशा प्रकारची वक्तव्ये उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केली. प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी शपथ घेऊन, विविध संकल्प केले. विद्यार्थ्यांनी सामाजिक जागृतीसाठी वृक्ष संवर्धनाबाबतच्या घोषवाक्याच्या सहाय्याने सामाजिक जागृती केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg