loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली येथे दि.८ ऑगस्ट रोजी निःशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नेत्र तपासणी होणार

वरवेली(गणेश किर्वे)- राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत समता फाउंडेशन भ. क. ल. वालावलकर रुग्णालय, डेरवण, चिपळूण प्राथमिक आरोग्य चिखली - उपकेंद्र वरवेली ग्रामपंचायत वरवेली यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत वरवेली, येथे निःशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नेत्र तपासणी शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते. दुपारी १ वा. आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिराची वैशिष्ट्ये - १) शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णाची निःशुल्क तपासणी व योग्य सल्ला मार्गदर्शन केले जाईल, २) मोतिबिंदू असलेल्या रुग्णांची भ. क. ल. वालावलकर रुग्णालय, डेरवण, चिपळूण येथे निःशुल्क शस्त्रक्रिया केली जाईल, ३) मोतिबिंदु रुग्णांची ने-आण करण्याची, राहण्याची, जेवणांची व काळ्या चष्म्याची निःशुल्क सोय करण्यात येईल, ४) मोतिबिंदु असलेल्या रुग्णांना भरतीची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल. या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg