loader
Breaking News
Breaking News
Foto

तुरळ-कडवई NH-66 वर भीषण अपघात; पाच दिवसांनी गुन्हा दाखल!

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील तुरळ येथे १ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातप्रकरणी तब्बल पाच दिवसांनी संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या दिवशीच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला होता, मात्र मोटार अपघात प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहिता कलम २८१ व मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या अपघातात इनोव्हा, महिंद्रा एक्सयूव्ही आणि युनिकॉर्न दुचाकी अशा तीन वाहनांचे नुकसान झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तुरळ-कडवई चौक हा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाण बनला आहे. येथे वारंवार होणारे अपघात लक्षात घेता, तातडीने फ्लायओव्हर उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि विविध सामाजिक संघटनांकडून पुन्हा करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg