loader
Breaking News
Breaking News
Foto

‘गावकी’चे कथासंग्रहाचे रविवारी प्रकाशन

रत्नागिरी: जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मीचौक, रत्नागिरी यांच्यावतीने रविवार दि.२ ऑगस्ट रोजी रत्नागिरीतील संगमेश्वरी-तिलोरी बोलीतील लेखक अमोल पालये यांच्या ‘गावकी’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैविध्यपूर्ण लेखन करणारे लेखक अमोल पालये यांचा ग्रामीण कथांचा ‘गावकी’ हा कथासंग्रह साकारण्यात आला असून, त्याचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरी-तिलोरी बोलीतील कथांचा ‘गावकी’ हा पहिलाच कथासंग्रह असून अमोल पालये यांनी या बोलीतून विविध कथा, एकांंकिका आणि तिलोरी बोलीतील साहित्याचे संकलनाचेही कार्य केले आहे.

टाइम्स स्पेशल

रविवार दि. २ ऑगस्ट रोजी माधवराव मुळ्ये सभागृह, झाडगांव, रत्नागिरी येथे सकाळी ११.०० वा. कथासंग्रह प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, वाचकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg