रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नाटे येथील एक चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना दिनांक ४ मार्च २०२६ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडली होती. नाटे येथील यश होम स्टेटच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शहाणे यांच्या घरी भाड्याने राहणारे फिर्यादी रोशन मोठाभाऊ बच्छाव (वय २७ वर्षे, व्यवसाय: प्रोजेक्ट सुपरवायझर, मूळ रा. चिंचावड, ता. मालेगाव, जि. नाशिक) हे कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रूमच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी यांच्या बॅगेत ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण दोन लाख एक्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला होता. या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३)(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी बी. बी. महामुनी यांनी तात्काळ मार्गदर्शन करून नाटे पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष तपास पथक तयार केले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सुरू असताना पोलिसांना गोपनीय व तांत्रिक माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे दिनांक २८ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी विकास टीपू पवार (वय २३, रा. निगडी बुद्रुक, सेवालाल मंदीराजवळ, ता. जत, जि. सांगली, सध्या रा. हुपरी पाण्याच्या टाकीजवळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि संपत बिल्लू पवार (वय २०, रा. निगडी बुद्रुक, सेवालाल मंदीराजवळ, ता. जत, जि. सांगली, मूळ रा. हुबनूर एल टी ०३, हुबनूर, जि. विजापूर, राज्य कर्नाटक) यांना मोझे हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले एकूण एक लाख एक्याण्णव हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नाटे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या सूचनांनुसार श्रेणी पो.उ.नि. संदीप ओगले, पो.हवा/९०९ विजय आंबेकर, पो.हवा/१४०७ दिपराज पाटील, पो.हवा/२६२ योगेश नावेकर आणि चा.पो.कॉ/२१५ अतुल कांबळे यांनी पार पाडली.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.