loader
Breaking News
Breaking News
Foto

‘हनुमान युवक क्रीडा मंडळ’, देवगड यांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी कॅरम स्पर्धेचे आयोजन

देवगड - स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगड यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा देवगड तालुक्यापुरती मर्यादित असून शालेय तसेच खुल्या गटासाठी घेण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खुल्या गटासाठी प्रवेश शुल्क १०० रुपये असून प्रथम क्रमांकासाठी १ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७५१ रुपये, तर उत्तेजनार्थ ३५१ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच शालेय गटासाठी प्रवेश शुल्क ५० रुपये असून प्रथम क्रमांकासाठी ७५१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५५१ रुपये आणि उत्तेजनार्थ ३५१ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दोन्ही गटांमध्ये आकर्षक चषकही देण्यात येणार आहेत.

टाइम्स स्पेशल

स्पर्धेची नोंदणी १३ ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला कोणत्याही एका गटात सहभागी होता येईल. शालेय गटासाठी स्पर्धकाचे वय १६ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. ही कॅरम स्पर्धा प्राथमिक शिक्षक भवन, कॉलेज रोड, देवगड येथे आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त कॅरमप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन हनुमान युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विलास रुमडे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg