loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची ओरोस मुख्यालय जिल्हा विशेष शाखेत बदली

सावंतवाडी - सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची ओरोस मुख्यालय जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे. त्यांच्या जागी कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मकदुम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार दोन वर्षांपूर्वी अमोल चव्हाण यांनी हाती घेतला होता त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची ओरोस जिल्हा मुख्यालय जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षक पदी बदली झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लवकरच ते या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर त्यांच्या जागी सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदावर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदुम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मकदूम यांच्याकडे मालवण पोलीस ठाण्याचा देखील प्रभारी कार्यभार आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील दोन वर्ष कार्यकाल पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षक व अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यानुसार ही कार्यवाही झाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg