loader
Breaking News
Breaking News
Foto

आदिवासी दिनानिमित्त मेळावा; खेडमध्ये ३० लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ

खेड (प्रतिनिधी) - जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत खेडमध्ये आज आदिवासी नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात ३० जणांना योजनेतील लाभाचे धनादेश, जातीचे दाखले, घरकुलाच्या चाव्या, डिजिटल सातबारा उतारे, स्मार्ट कार्ड आणि प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तळागाळातील आदिवासी बांधवांना शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. सर्वसामान्य नागरिकांना योजनांची सुलभ माहिती मिळावी यासाठी १६ विविध शासकीय विभागांनी आपले माहिती फलक आणि स्टॉल उभारले होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती पालेकर, माजी आमदार संजय कदम, विविध गावांचे सरपंच आणि सर्व १६ विभागांचे तालुका विभागप्रमुख उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg