loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात पत्नीला पाहण्यासाठी जाणारे मोरगावचे पिता व पुत्री बेपत्ता

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीला पाहण्यासाठी जाणारे पती व मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. लाडोबा लवू कदम (४०) व निहालीका लाडोबा कदम (६) दोघेही रा. मोरगाव अशी पिता-पुत्रीचे नाव आहे. याबाबत प्रितम अर्जुन जाधव (३१, रा. मळगाव-जाधववाडी, ता. सावंतवाडी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची बहीण प्राची हिच्यावर सावंतवाडी येथील साई हॉस्पिटलमध्ये पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लाडोबा लवू कदम हे आपली सहा वर्षीय मुलगी निहालिका हिला घेऊन मोरगाव येथून सावंतवाडीकडे निघाले असल्याची माहिती त्यांनी स्वतः फोन करून प्रितम कदम यांना दिली होती. मात्र दुपारपर्यंत ते साई हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर बांदा बसस्थानक परिसरात चौकशी केली असता काही स्थानिकांनी संबंधित व्यक्ती व मुलगी यांना पाहिल्याचे सांगितले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, बसस्थानकाजवळच त्यांची हिरोहोंडा मोटारसायकल उभी अवस्थेत आढळून आली. गाडीवर चावी तसेच रेनकोटची पिशवीही होती. त्यानंतरही परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही दोघांचा काहीच मागमूस लागलेला नाही. लाडोबा लवू कदम यांची उंची ५ फुट ४ इंच, सावळा वर्ण, अंगाने मजबूत, काळे केस, मिशी ठेवलेली, फ्रेंचकट दाढी, अंगात पांढर्‍या रंगाचा टी-शर्ट व पॅन्ट आणि निहालिका हिची उंची सुमारे ३ फुट, सावळा वर्ण, सरळ बॉबकट केस, अंगात ऑरेंज रंगाचे जॅकेट घातलेले आहे. हे दोघेही कोठेही आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg