संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने आयोजित भव्य विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा २०२६ रविवारी (दि. २ ऑगस्ट) देवरुख येथील लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून समाजातील शैक्षणिक प्रगती व सामाजिक ऐक्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर तालुका तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष संतोष रहाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य तथा माजी बांधकाम सभापती विनोद झगडे, रत्नागिरी जिल्हा तेली समाज संघाचे कोषाध्यक्ष दीपक राऊत, संघटक मनोहर रहाटे तसेच सदस्य नारायण झगडे उपस्थित होते.
यावेळी महिला अध्यक्षा दीपिका किर्वे, युवक अध्यक्ष प्रवीण रहाटे, प्रांतिक महिला अध्यक्षा प्रियांका भोपळकर, वधूवर मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष पावसकर, उपाध्यक्ष दीपक सकपाळ, तुकाराम किर्वे, उद्योजक दिलीप रहाटे, सदाशिव रहाटे, सुरेश महाडिक, मधुरा भोपळकर, मनीषा पावसकर, पद्माताई विभुते, मेघना रहाटे, श्रुती टीळेकर, अविनाश आंब्रे, विजय राऊत (निवे), गोकुळ किर्वे यांच्यासह तालुक्यातील तेली समाजातील विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, तसेच समाजाने संघटित राहून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या अनुभव, कार्य आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन हरिश्चंद्र पवार यांनी केले. शेवटी संघटनेचे अध्यक्ष संतोष रहाटे यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, समाजबांधव व सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर आयोजित स्नेहभोजनाने या भव्य सोहळ्याची सांगता झाली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.