loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर उत्तर मंडलातील विकासकामांसाठी भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना निवेदन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर उत्तर मंडलातील विविध विकासकामांना गती मिळावी, तसेच प्रलंबित विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. संगमेश्वर उत्तर मंडलातील रस्ते, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच अन्य विकासकामांबाबत या निवेदनातून प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संबंधित विकासकामांना शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करून मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत दादा जाधव तसेच युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रथमेश शिंदे उपस्थित होते. संगमेश्वर उत्तर मंडलाच्या विकासासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे आगामी काळात विविध विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg