loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी अव्वल व्हॉलिबॉलपटू मुजम्मिल दळवी यांच्याकडून न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेला क्रीडा साहित्याची भेट; खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण

​रत्नागिरी (प्रतिनिधी): शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि नावाजलेले अव्वल व्हॉलिबॉलपटू मुजम्मिल दळवी यांनी नुकतीच आपल्या मातृसंस्थेला सस्नेह भेट दिली. या वेळी आपल्या शालेय जीवनातील क्रीडा क्षेत्रातील विविध आठवणींना उजाळा देत त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट आणि व्हॉलिबॉलचे विविध क्रीडा साहित्य शाळेला भेट म्हणून सुपूर्द केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मुजम्मिल दळवी यांनी आपल्या शालेय जीवनात व्हॉलिबॉल खेळात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांनी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरापर्यंत उत्कृष्ट खेळ करत सैतवडे प्रशालेचा नावलौकिक उंचावला होता. शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रशालेच्या विविध उपक्रमांची तसेच शैक्षणिक प्रगतीची विचारपूस केली. त्यानंतर प्रशालेतील क्रीडापटूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी क्रिकेट बॅट, बॉल, स्टंप तसेच व्हॉलिबॉल नेट आणि बॉल आदी क्रीडा साहित्य प्रशालेच्या सर्व खेळाडूंच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका सिद्धी लांजेकर यांच्याकडे सुपूर्द केले.

टाईम्स स्पेशल

​उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दळवी यांनी विद्यार्थ्यांना जिद्दीने आणि मेहनतीने अभ्यास तसेच खेळात प्राविण्य मिळवून स्वतःचे, कुटुंबाचे आणि शाळेचे नाव मोठे करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष साजिदभाई शेकासन, नसिम शेकासन, रमेश गंधेरे, संज्योत खेडेकर आणि हेमंत काताळे आदी मान्यवर उपस्थित होते. ​माजी विद्यार्थ्याने शाळेप्रती जपलेली ही बांधिलकी आणि दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडेचे अध्यक्ष सज्जादभाई सय्यद, सचिव समीर सय्यद, खजिनदार वहाबभाई खलपे, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंदाने मुजम्मिल दळवी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg