loader
Breaking News
Breaking News
Foto

चौक या ऐतिहासिक गावातील ब्रिटीश कालीन पुलावर चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य , खड्ड्यांमुळे बंद पडलेल्या गाडीमुळे वाहतूक कोंडी

चौक, (अर्जुन कदम) चौक या ऐतिहासिक गावातील ब्रिटीश कालीन पुलावर चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान होत असताना, बंद पडलेल्या गाडीमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली असल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसात खड्डे भरण्याचा केविलवाणा प्रयत्न आजही सार्वजनिक बांधकाम विभागाने करून बांधकाम क्षेत्रात एक नवा उच्चांक निर्माण केला आहे.खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत चौक हद्दीत मोरबे धरणाच्या धावरी नदीवर फार पूर्वीचा म्हणजे ब्रिटीश कालीन पूल आहे, या प्रतिवर्षी या पुलावर खड्डे पडतात, संरक्षण कठड्याला झाडे उगवतात,याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे लक्ष नसते. हे दिसत आहे, खड्डे भरण्याचा केविलवाणा प्रयत्न नेहमी केला जातो, आता जोरदार पाऊस पडत आहे त्यातच खड्डे भरून त्यावर वापरलेल्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या टाकून पावसा पासून खड्ड्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्नही केला तोही वाया गेला.आहे.मात्र कार्यकर्ते यांना याचे गांभीर्य लक्षात येत आहे.हा ब्रिटीश कालीन पूल आहे.या पुलाची कार्यक्षमता संपली असल्याचे सांगण्यात येत असून याच्या दुरुस्ती व रुंदी करणासाठी निधी उपलब्ध झाला आहे, मात्र तो का खर्ची पडत नाही? असा वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ब्रिटीश दूतावास यांच्या कडून या पुलाची कार्यक्षमता संपली आहे, असे पत्र पाठवले असल्याची चर्चा सुरू आहे. मागे भर पावसात खड्डे भरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता ही तेच सुरू आहे, मात्र चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य एवढे पसरले आहे की, गाडीला वाट काढता येत नाही.गाड्या बंद पडत आहेत, गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे, यात दुचाकी आणि तीन चाकी वाहनाचे नुकसान होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेवर दुरुस्ती केली असती तर ही वेळ आली नसती.बंद गाड्यांमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे, दुसरा पर्याय नसल्याने जनतेची मोठी तारांबळ झाली आहे.दरवर्षी याच खड्ड्यातून लोक प्रवास करतात, आणि गणपती बाप्पा यांचे आगमन होते आणि गणपती बाप्पा यांना निरोप दिला जातो, पुढच्या वर्षी याल तेव्हा अशाच खड्ड्यातून तुमचे स्वागत केले जाईल, अशी मिश्किल टिपण्णी केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg