मालवण (प्रतिनिधी) - देवबाग येथील एका हॉटेलमध्ये काम करणार्या चंद्रशेखर मल्लिकार्जुन राठोड (वय २०, रा. विजापूर) या कामगार युवकाचा मृतदेह हॉटेलच्या मागील बाजूस असणार्या स्विमिंग पूलच्या फिल्टर रूमच्या केबिनमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळी सापडून आला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत संबंधित हॉटेलच्या मॅनेजरने मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे. चंद्रशेखर राठोड हा मार्च महिन्यात देवबागमधील संबंधित हॉटेलमध्ये कामासाठी आला होता. तो वेटर म्हणून काम करत होता. आज सकाळी तो झोपत असलेल्या रूममध्ये दिसून न आल्याने मॅनेजरने त्याचा शोध घेतला. तो सापडून न आल्याने मॅनेजरने हॉटेल मालकास कळविल्यावर मालकाने सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले असता मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर हा हॉटेलच्या स्विमिंग पूलच्या फिल्टर रूमकडे जाताना दिसून आला. त्यानुसार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मॅनेजर व इतर कामगारांनी फिल्टर रूमकडे जाऊन शोधाशोध केली असता तेथील केबिन मध्ये चंद्रशेखर याचा मृतदेह लोखंडी बाराला नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ व मालवण पोलीसांना माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक खाडे, हेड कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व प्राथमिक तपास केला. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पेडणेकर हे करीत आहेत.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.