बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सखोल पाहणी करत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून येथे अत्यावश्यक ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्याची ठाम मागणी केली. महाराष्ट्र शासनाचे सचिव ई. रवींद्रन (भा.प्र.से.), आरोग्य संचालक आंबाडेकर आणि कोल्हापूर विभागाचे उपसंचालक माने यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. त्यांनी रुग्णालयातील दाखल रुग्णांशी संवाद साधत उपचारांची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती घेतली.
पाहणीदरम्यान औषधसाठा, आभा आणि आयुष्मान भारत योजनांची अंमलबजावणी, पुरुष व महिला वॉर्डमधील उपचार व्यवस्था, रुग्णालयातील स्वच्छता, नोंदवही, तसेच इतर मूलभूत सुविधांची बारकाईने तपासणी करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी बांदा हे गोवा-महाराष्ट्र सीमेवरील महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर युनिटची नितांत गरज असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
या भेटीप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कर्तसकर, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, आरोग्य कर्मचारी तसेच जनआरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या पाहणीमुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उन्नतीबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.