loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील साखर गावचे सुपूत्र सुधीर उतेकर "महाराष्ट्र राज्य सैनिक रत्न" पुरस्काराने सन्मानित

खेड - कारगील विजय दिनाचे औचित्य साधुन सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्यातर्फे "महाराष्ट्र राज्य सैनिक रत्न" पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यातील साखर गावचे सुपूत्र सुधिर अर्जुन उतेकर यांना "महाराष्ट्र राज्य सैनिक रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशसेवा, प्रामाणिकपणा, नेतृत्व आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम म्हणजे सुधीर अर्जुन उतेकर. त्यांचे वडील कै.अर्जुन दौलत उतेकर यांना भारतीय सेनेतील अतुलनीय कार्याबद्दल "राष्ट्रपती पुरस्काराने" सन्मानित केले गेल होते. देशसेवेचा हा गौरवशाली वारसा सुधीर अर्जुन उतेकर यांनी आपल्या कार्यातून अभिमानाने पुढे घेऊन जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय सेनेत हवालदार म्हणून उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतरही, त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे, नेतृत्वगुणांमुळे आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वामुळे ते आजही "मेजर साहेब" म्हणून १५ गावांमध्ये आदराने ओळखले जातात. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी इंडियन ओव्हरसीज बँक येथे अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावत बँकिंग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. कर्मचारी हितासाठी सातत्याने कार्य करत त्यांनी ऑल इंडिया इंडियन ओवरसीज बँक एम्प्लॉईज यूनीयन मध्ये "असिस्टंट जनरल सेक्रेटरी" या राष्ट्रीय स्तरावरील पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. तसेच इंडियन ओव्हरसीज बँक महाराष्ट्र एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या संस्थेच्या "चेअरमन" पदापर्यंत त्यांनी यशस्वी झेप घेतली.

टाईम्स स्पेशल

सचिव-साखर ग्रामविकास मंडळ मुंबई, अध्यक्ष- बामणवाडी विकास मंडळ मुंबई,अशा विविध सामाजिक संस्थांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सांभाळत ते सातत्याने समाजहिताचे कार्य करत आहेत. भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही देशसेवा आणि जनसेवा यांचा वसा जपत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी सैनिकांचा गौरव करण्यासाठी हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी सुधीर अर्जुन उतेकर यांना "महाराष्ट्र राज्य सैनिक रत्न" 2026 हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवाकार्याची, समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची तसेच बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या प्रामाणिक सेवेचा, समाजाप्रती असलेल्या समर्पणाचा आणि नेतृत्वगुणांचा सन्मान आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg