दापोली - मांदिवली गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या ५० एकरांवरील बांबू लागवड प्रकल्पाला शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी दापोलीचे गट विकास अधिकारी गणेश मंडलिक हेही उपस्थित होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत बांबू शेतीचे महत्त्व, शासकीय योजनांचा लाभ आणि शाश्वत शेतीची गरज याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामसेवक पोपट भोरजे यांनी केली. गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे बांबूपासून तयार केलेल्या भेटवस्तू देऊन स्वागत केले. त्यानंतर वैदेही रानडे आणि गणेश मंडलिक यांनी शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष बांबूची लागवड करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी भावेश कारेकर यांनी मंडणगड आणि दापोली तालुक्यात २,००० एकरांहून अधिक क्षेत्रावर बांबू लागवड करून त्यावर आधारित उद्योग उभारण्याचा संकल्प मांडला. बांबू शेतीमुळे हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यास मदत होण्याबरोबरच ग्रामीण भागात शाश्वत उत्पन्न, स्थानिक रोजगार आणि पर्यावरणपूरक विकासाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मयुरेश जाळगावकर आणि केतन निंबरे हे सातत्याने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून लागवडीचा पाठपुरावा करत आहेत. तसेच किसन निंबरे, अरुण भानत, जयेश शिगवण, धोंडू सावंत, नागेश सावंत, दिलीप सावंत, रंजना सावंत, लक्ष्मी केसरकर, वंदना सावंत व गावातील इतर महिला पुरुष शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पासाठी सक्रियपणे योगदान देत आहेत.
मांदिवली गावात टप्प्याटप्प्याने ५०० एकरांवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ५० एकर क्षेत्रासाठी ७,५०० बांबूची रोपे लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. मार्गदर्शनादरम्यान मा. वैदेही रानडे यांनी शेतकऱ्यांच्या पुढाकाराचे कौतुक करत, बांबू शेती ही पर्यावरण संवर्धनासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आणि भविष्यातील शाश्वत विकासाची दिशा ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला. "मांदिवली गावाने शाश्वत शेती, हरित विकास आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दिशेने टाकलेले हे एक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण पाऊल आहे."
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.