loader
Breaking News
Breaking News
Foto

एकच ध्यास, समृद्ध पर्यावरणाचा विकास’: मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा ९ ऑगस्टला भरणे येथे भव्य मेळावा - महेशराव मोरे

खेड - वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्त्व सांगणारा हा संदेश दिला होता. आजच्या आधुनिक आणि औद्योगिक युगात या संदेशाची गरज अधिक तीव्रतेने भासत आहे. वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि ऋतूचक्राचा बिघडलेला समतोल या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन ही केवळ काळाची गरज नसून आपल्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल हेच सामाजिक भान जपून, मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या संकल्पनेतून आणि सहयोगातून खेड येथे ९ ऑगस्ट २०२६ रोजी गणेश मंगल कार्यालय येथे तालुक्यातील मराठा समाज बांधव शेतकरी यांना ’मोफत वृक्ष रोप वाटप’ या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणाची मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण भूमिकाङ्गनिसर्ग आणि मानव यांचे नाते अतूट आहे. पर्यावरण संतुलित राहिले तरच मानव जात आणि इतर सजीव समृद्ध होऊ शकतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एक मोठे झाड दिवसाला चार माणसांना पुरेल इतका ऑक्सिजन देते आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. झाडे म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. झाडांची मुळे माती धरून ठेवतात, ज्यामुळे जमिनीची धूप थांबते आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. वेळेवर आणि पुरेसा पाऊस पडण्यासाठी घनदाट वनराई आवश्यक आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे शहरांचे तापमान वाढत आहे. झाडांची सावली आणि त्यांच्या पानांमधून होणारे बाष्पीभवन आजूबाजूचा परिसर थंड ठेवण्यास मदत करते. झाडे ही शेकडो पक्षी, कीटक आणि लहान प्राण्यांचे आश्रयस्थान असतात. निसर्गाची अन्नसाखळी टिकवण्यासाठी ही जैवविविधता आवश्यक आहे. खरे यश आणि समृद्धी केवळ आर्थिक प्रगतीत नसते, तर ती निसर्गाच्या सोबतीने मिळवलेली असते. यालाच ’शाश्वत विकास’ किंवा ’पर्यावरण संतुलित समृद्धी’ म्हणतात. आज आपण लावलेले एक रोप उद्या मोठे झाड बनून आपल्या येणार्‍या पिढ्यांना शुद्ध हवा, सावली आणि फळे देईल. प्रदूषणापासून मुक्ती मिळवायची असेल, तर औषधांपेक्षा झाडांची संख्या वाढवणे हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी हेच खर्‍या समृद्धीचे लक्षण आहे. मराठा क्रांती स्वराज्य संघटना केवळ सामाजिक हक्कांसाठीच लढत नाही, तर समाजाच्या आणि निसर्गाच्या आरोग्यासाठीही कटिबद्ध आहे. सदानंदराव भोसले आणि महेशराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा उपक्रम केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून, एका हरित क्रांतीची सुरुवात आहे. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

९ ऑगस्ट रोजी आयोजित या रोप वाटप कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. संघटनेच्या वतीने मोफत मिळणारे रोप घरी न्या, त्याची केवळ लागवडच करू नका, तर ते झाड मोठे होईपर्यंत त्याचे पुत्राप्रमाणे संगोपन करा. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना खेड तालुका अध्यक्ष श्रीराम कदम यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील परिसराला अधिक हिरवेगार आणि समृद्ध बनवूया! कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष बडोद्याचे उद्योजक अजय तिडके, राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, अनिल बुवा जाधव, जिल्हा सरचिटणीस अंकुशराव चाळके, जिल्हा सचिव विवेक कदम, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आरती बबनराव दळवी, वैद्यकिय राज्य अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, तालुका संघटक राजेंद्र मोरे आदि मान्यवरांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष कृष्णा शेलार यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg