loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात एलसीबीची धडक कारवाई; १.८३ लाख रुपयांची महाराष्ट्र बनावटीची दारू जप्त

मालवण (प्रतिनिधी) : विक्री करण्याच्यादृष्टीने राहत्या घराच्या पाठीमागील शेडमध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली तब्बल १ लाख ८३ हजार १४५ रुपये किंमतीची महाराष्ट्र बनावटीची दारू व बिअर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सिंधुदुर्गच्या पथकाने जप्त केली आहे. ऑपरेशन ऑल आउट' अंतर्गत मालवण तालुक्यात एलसीबीने धडक कारवाई केली असून याबाबत सीमा संदीप जगताप (वय ४८, रा. कुमामे, गुरामवाडी, ता. मालवण) यांच्याविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सिंधुदुर्गच्या पथकाने 'ऑपरेशन ऑल आउट' अंतर्गत मालवण तालुक्यात धडक कारवाई केली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी दि. २८ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कुमामे गुरामवाडी येथे छापा टाकला. यावेळी राहत्या घराच्या पाठीमागील शेडमध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली महाराष्ट्र बनावटीची दारू आणि बिअरचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ हा साठा जप्त करून संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदविला.

टाईम्स स्पेशल

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील पाटील, हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोजा, आशिष जामदार आणि स्वाती सावंत यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास मालवण पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg