loader
Breaking News
Breaking News
Foto

रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल निर्मिती स्पर्धेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे यश, दोन मॉडेल्सना क्रमांक प्राप्त

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - नगरपंचायत कसई दोडामार्ग यांच्यामार्फत आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल निर्मिती स्पर्धा दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी नगरपंचायत हॉलमध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एकूण पाच मॉडेल्स सहभागी झाले होते. त्यापैकी प्रशालेच्या दोन मॉडेल्सनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. गिरीजा बाबुराव धुरी, अनुष्का महादेव गवस, सिया सुतार यांनी तयार केलेल्या मॉडेल्सला प्रथम क्रमांक तर गोविंद रवींद्र खडपकर यांने केलेल्या मॉडेलला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यशस्वी विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, मुख्याध्यापक संजय पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg