loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी माजगाव एमआडीसीत फॅक्टरीच्या छतावरुन ५० किलो कोकम चोरीला, सीसीटीव्हीत पुन्हा चोरीचा प्रयत्न उघड

सावंतवाडी - सावंतवाडी माजगाव एमआयडीसी येथे फॅक्टरीच्या छतावर सुकत घातलेली ५० किलो कोकम अज्ञाताने चोरून नेली. या चोरीत सुमारे ३० हजार रुपयांचे कोकम चोरिस गेले असून याप्रकरणी फिर्यादी प्रदीप शेवडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर तेथीलच स्थानिक व्यक्तीवर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला आहे. यातील फिर्यादी यांची माजगाव एमआयडीसी येथे फूड प्रोसेसिंग युनिट असून त्यांच्या फॅक्टरी प्रोडक्ट्ससाठी लागणारे कोकम कंपनीच्या इमारतीच्या छतावर सुकत घातले होते. अज्ञातने ते चोरून नेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेत तीस हजार रुपयांचे कोकम चोरीस गेले आहे. या घटनेनंतर फिर्यादी यांनी तिथे सीसिटीव्ही कॅमेरे लावले त्यावेळी दोन दिवसानी शेजारील इसम पुन्हा तिथे चोरी करण्यासाठी आल्याचे कॅमेरेमध्ये कैद झाले. या चोरीची तक्रार बुधवारी पोलीस ठाण्यात शेवडे यांनी दिली असून तेथील स्थानिक माहितगार व्यक्तीवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस हे कॉ धुरी करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg