loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीसंभाजी भिडेगुरूजींमुळे तुळजापूर ते सांगली दरम्यान एस टी चा भीषण अपघात टळला ,गुरूजींनी वाचवले प्रवाशांचे प्राण

सांगली : श्री संभाजी भिडे गुरुजींच्या तुळजापूर,सोलापूर येथे काल सभा व बैठका होत्या. व्याख्यान, आणि पुढील बैठका असल्यामुळे गुरुजी मुक्काम न करता रात्री उशिरा एसटी ने सांगलीला येत होते. चालकाच्या पाठीमागे असणाऱ्या सीटवर गुरुजी बसले होते. सर्व प्रवाशी झोपेत होते. गुरुजींना मात्र कसलाही थकवा नव्हता एसटी कवठेमहांकाळ जवळ आल्यावर मिरज पंढरपूर महामार्गावर कुची येथे चालकाला काहीतरी होत असल्याचे गुरुजींना जाणवले प्रसंगावधान ओळखून त्यांनी चालकाला एसटी बाजूला घेण्यास सांगितले चालकांनी एसटी बाजूला घेतली आणि चालकाला अर्धांगवायूचा झटका आला

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यावेळी पहाटे साडेचार वाजले होते. लांब पल्याची गाडी असल्यामुळे तीही उशिराची असल्यामुळे गाडीत मोजकेच प्रवाशी होते. पहाटेची वेळ होती महामार्गावर रहदारी नव्हती. कुणाला काही सुचत नव्हते गुरुजी खाली उतरले आणि प्रवाशाच्या मोबाईल वरून #कवठेमहांकाळचे शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष प्रदीप शिंदे सरकार यांना फोन लावून घटनेची कल्पना दिली व ताबडतोब येण्यास सांगितले. सुदैवाने ते मिरज पंढरपूर महामार्गावर लांडगेवाडी येथे हॉटेल शिवटेक या ठिकाणी होते. त्यांनी कवठेमहांकाळ येथून धारकरी प्रवीण देसाई, रोहित जाधव, निलेश पोतदार पवणपूञ रणजीत माने संदीप मंङले यांना बोलावून घेतले व त्यांच्यासोबत गाडीने तेथे गेले पहाटेची वेळ होती प्रवाशी गांगरून गेले होते रुग्णवाहिका बोलावली चालकाला त्यामध्ये घालवून मिरज सिव्हिल ला पाठवण्यात आले. त्यानंतर गुरुजींनी मिरजेचे धारकरी प्रमोद धुळूबुळू यांना तातडीने तिथे जाऊन जी लागेल ती प्रक्रिया पूर्ण करा, तिथे थांबा असे सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg