loader
Breaking News
Breaking News
Foto

करिअर कट्टा कार्यशाळेत, आय.सी.एस. महाविद्यालयाचा सहभाग

खेड - महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र तसेच आर. पी. गोगटे कला व विज्ञान आणि आर. व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करिअर कट्टा विभागीय एकदिवसीय कार्यशाळा’ नुकतीच रत्नागिरी येथे उत्साहात पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेत आय.सी.एस. महाविद्यालय, खेड येथील करियर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक प्रा. सुप्रिया काडगे यांनी सहभाग नोंदवत करिअर कट्टा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन व माहिती आत्मसात केली. तसेच आय.सी.एस. महाविद्यालयाच्या करियर संसदेचे मुख्यमंत्री साहिल भुवड या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

कार्यशाळेस महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. पी. गोगटे कला व विज्ञान आणि आर. व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद रघुनाथ साखळकर होते. तसेच विविध जिल्ह्यांतील प्राचार्य, समन्वयक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. करिअर कट्टा उपक्रम अधिक प्रभावीपणे राविण्यासाठी आवश्यक दिशा व प्रेरणा मिळावी म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ.अनिता आवटी तसेच करिअर कट्टा समन्वयक प्रा.डॉ. सी आर साळुंखे सतत प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मत सहभागी प्रतिनिधींनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg