संगमेश्वर, (प्रतिनिधी) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये लगबग वाढली आहे. संगमेश्वर तालुक्यातील परचुरी-वेल्येवाडी येथील युवा कलाकार संदेश वेल्ये सध्या मुंबईस्थित गुरुप्रसाद कला केंद्रात आकर्षक गणेशमूर्ती साकारण्याच्या कामात व्यस्त असून, त्यांच्या हस्तकलेतून विविध आकारांच्या आणि देखण्या मूर्तींना अंतिम रूप दिले जात आहे.
मूळचे परचुरी-वेल्येवाडी येथील असलेले संदेश वेल्ये यांनी मुंबईत राहून मूर्तीकलेचे प्रशिक्षण व अनुभव मिळविला आहे. त्यांनी संगमेश्वर लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयातून कला शाखेची पदवी पूर्ण केली आहे. चित्रकला, मूर्तीकला आणि विविध कलाविषयक कामांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य असून, केवळ पेंटिंगच नव्हे तर कलेच्या प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची त्यांची आवड आहे. निवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांच्या पेंटिंग क्षेत्रात त्यांना १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. विविध कलाप्रदर्शने, शैक्षणिक यश आणि सर्जनशील कलाकृतींमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बारकाईने काम करण्याची हातोटी आणि कल्पकतेमुळे त्यांच्या कलाकृतींना विशेष पसंती मिळते.
सध्या मुंबईतील गुरुप्रसाद कला केंद्रात गणेशमूर्ती घडविण्याचे काम वेगाने सुरू असून संदेश वेल्ये यांच्या कुशल हातातून साकारल्या जाणाऱ्या मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अंतिम रंगरंगोटी, अलंकरण आणि सुबक आकार देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यंदाही त्यांच्या मूर्तींना चांगली मागणी असल्याचे चित्र आहे. परचुरीच्या या युवा कलाकाराने आपल्या कलेच्या बळावर कोकणासह मुंबईतही वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या या यशस्वी कलाप्रवासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.