loader
Breaking News
Breaking News
Foto

मिरजोळी स्टॉपवर विद्यार्थ्यांनी हात दाखवून पण एस.टी. थांबली नाही; युवा सेना गुहागर आक्रमक

वरवेली(गणेश किर्वे)-चिपळूण तालुक्यातील मिरजोळी स्टॉपवर विद्यार्थ्यांनी हात दाखवून, एस.टी. थांबवण्याची विनंती करून सुद्धा एस.टी. थांबली नाही नसल्याने युवा सेना, गुहागर आक्रमक झाली असून, युवासेना गुहागर शहरच्या वतीने, गुहागर एस.टी. आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन, मिरजोळी स्टॉपवरील प्रकाराबद्दल जाब विचारण्यात आला. दि. ३ ऑगस्ट रोजी, चिपळूण-गुहागरच्या ७ बसने मिरजोळी स्टॉपवर हात दाखवणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना न थांबताच पुढे निघाल्या. या संदर्भात युवा सेनेच्या वतीने गुहागर आगार व्यवस्थापकांना स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, _भविष्यात अशा पद्धतीचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही_. जर पुन्हा घडलं, तर _शिवसेना आणि युवा सेना एकत्रित येऊन या बेजबाबदार एस.टी. चालकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊ. यापुढे विद्यार्थ्यांवर होणारा निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी गुहागर शहर युवासेना शहरप्रमुख राज विखारे, शिवसेना ग्राहक कक्ष तालुकाप्रमुख आदेश मोरे, युवासेना उपशहरप्रमुख सोहम सातार्डेकर, विभाग प्रमुख समीर कनगुटकर वार्ड क्र.७ चे शाखाप्रमुख कल्पेश बागकर, युवासेना विभागप्रमुख सुजल होळब, युवासेना शाखाधिकारी आर्यन पाटील, युवासैनिक सुयोग गोयथळे आदी. उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg