loader
Breaking News
Breaking News
Foto

वीज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा; आचिर्णे येथे तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागून आठ शेळ्यांचा मृत्यू; तर बारा शेळ्या गंभीर जखमी

वैभववाडी(प्रतिनिधी)- वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कामाचा फटका तालुक्यातील आचिर्णे येथे तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागून आठ शेळ्यांचा मृत्यू झाला, तर बारा शेळ्या गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत शेळीपालक शेतकरी बाबू शामू खरात यांनाही विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी घडली. या घटनेत शेळी मालक बाबू खरात यांना ही विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाले आहेत. तातडीने उपचारासाठी ओरोस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तुटलेल्या वीजवाहिन्यांमुळे नागरिक व जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित यंत्रणेकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैभववाडी तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या बोगस कारभाराचा फटका गोरगरीब शेतकर्‍यांना बसला असून, त्या तुटलेल्या वीज वाहिनीमुळे अचिर्णे येतील बाबू खरात या शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्‍याला वीज वितरण कंपनीकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg