loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू; सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

सावंतवाडी: सावंतवाडी येथील सबनीसवाडा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. शंकर महादू उघडे (वय ८८, मूळ रा. फुलवडे, ता. आंबेगाव, जि. पुणे, सध्या रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, शंकर उघडे हे सन २०११ पासून अर्धांगवायू (पॅरालिसिस) या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर ओरोस, कोल्हापूर व सावंतवाडी येथे उपचार सुरू होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना लघवीचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी तात्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ​याबाबत सावळीराम शंकर उघडे (वय ५३) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली. ​घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे, पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस हवालदार शिंदे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg