loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलाड-आंबेवाडी नाक्यावरील जीवघेणे खड्डे सामाजिक पुढाकारातून बुजवले; प्रमोद शेठ म्हसकर यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक

कोलाड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्याजवळ उड्डाणपुलाखाली आणि सर्व्हिस रोडवर पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असताना सामाजिक कार्यकर्ते प्रमोदशेठ म्हसकर यांनी आपल्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढाकार घेत खड्डे बुजवून वाहतुकीस दिलासा दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या अनेक दिवसांपासून कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाखाली तसेच दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी आणि प्रवासी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत होते. दुचाकी व चारचाकी वाहने खड्ड्यांत अडकणे, अपघाताच्या घटना घडणे आणि एका प्रवासी बसलाही मोठा अपघात टळल्याची घटना घडली होती. या समस्येबाबत सोशल मीडियावर तसेच वृत्तपत्रांमधून सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रभावी दखल घेतली नाही.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले प्रमोद शेठ म्हसकर यांनी सोशल मीडियावर प्रसारित झालेली परिस्थिती आणि वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेत आपल्या सामाजिक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह तातडीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. या उपक्रमामुळे वाहतुकीचा मार्ग सुरक्षित झाला असून नागरिकांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे. स्थानिक नागरिकांनी तसेच या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि प्रतिनिधींचेही आभार व्यक्त केले असून, समाजहितासाठी अशा लोकाभिमुख पुढाकारांची गरज असल्याची भावना व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg