loader
Breaking News
Breaking News
Foto

मुगीजमध्ये शेतकर्‍यांना मोफत काजू व सुपारी रोपांचे वाटप; ‘बीजांकुर ग्रुप’च्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

(दापोली - _सागर गोवळे)मुगीज - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) ग्रामीण जागृती कार्यानुभव रावे (RAWE)उपक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या ‘बीजांकुर ग्रुप’च्या संयुक्त विद्यमाने मुगीज येथे नुकताच मोफत रोपवाटप कार्यक्रम पार पडला. या माध्यमातून शेतकर्‍यांना सुधारित फळझाडांची रोपे वितरित करण्यात आली असून, स्थानिक शेतकर्‍यांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. कृषी महाविद्यालयाचा विस्तार शिक्षण विभाग, कोकण कृषी विद्यापीठ वाहनचालक संघटना आणि ‘बीजांकुर ग्रुप’ यांच्या पुढाकाराने मुगीज येथील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील एकूण ३० शेतकर्‍यांना प्रत्येकी एक ‘वेंगुर्ला-४’ या सुधारित जातीचे काजू कलम आणि ’श्रीवर्धनी’ जातीचे सुपारीचे रोप मोफत देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शेतकर्‍यांना फळबाग लागवडीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. प्रवीण झगडे (कार्यक्रम अधिकारी) यांनी वेंगुर्ला-४ काजू आणि श्रीवर्धनी सुपारीच्या जातींची वैशिष्ट्‌ये, लागवडीसाठी दोन रोपांमधील योग्य अंतर, खड्डे तयार करण्याची पद्धत, योग्य सिंचन व्यवस्था आणि लागवडीनंतर रोपांची घ्यायची काळजी यावर तांत्रिक मार्गदर्शन केले. डॉ. संतोष वारवडेकर (विस्तार शिक्षण विभागप्रमुख), डॉ. विजय देसाई (रावे केंद्रप्रमुख) आणि डॉ. नरेंद्र प्रसादे (विषय विशेषज्ञ) यांनी वृक्षलागवडीचे वाढते महत्त्व, फळबागांच्या माध्यमातून होणारे पर्यावरण संवर्धन आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नात होणारी शाश्वत वाढ या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला वाहनचालक संघटनेचे खजिनदार बाळकृष्ण ठाकरे, अरविंद पोसकर आणि सर्वेश मोहिते विशेषत्वाने उपस्थित होते. रावे (RAWE) अंतर्गत ‘बीजांकुर ग्रुप’च्या कृषी विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांची नोंदणी, कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रत्यक्ष रोपवाटप अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पाडले. या फायदेशीर उपक्रमाबद्दल स्थानिक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे विशेष आभार मानले. आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg