loader
Breaking News
Breaking News
Foto

समुद्रकिनारा सुरक्षेसाठी मालवण बंदर जेटीवर ’पोर्टा केबिन’ची उभारणी; मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

मालवण(प्रतिनिधी)- समुद्रकिनार्‍याची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने शासनाच्या महत्वपूर्ण उपक्रमअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ‘पोर्टा केबिन’ मालवण येथे उभारण्यात आले आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण बंदर जेटी येथील ’पोर्टा केबिन’ चे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील विविध महत्वपूर्ण समुद्रकिनारी आणि लँडिंग पॉईंटवर अशा पोर्टा केबिनची उभारणी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी किनारी भागात मोठ्या प्रमाणात बोटींची ये-जा आणि पर्यटकांची गर्दी असलेल्या १४ लँडिंग पॉईंटची सुरक्षा लक्षात घेण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे हे पोर्टा केबिन असणार आहे. त्यापैकी मालवण, तारकर्ली आणि सर्जेकोट येथे पोर्टा केबिन उभारण्यात आले असून किनारी सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी ही केंद्रे कार्यरत राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण बंदर जेटी येथील पोर्टा केबिनच्या उदघाटन प्रसंगी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेवक विकी तोरसकर, देवानंद लोकेगांवकर, किसन मांजरेकर, पंकज सादये, सुरेश बापार्डेकर यांसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. मालवण किनारपट्टीवर दिवसरात्र गस्त व देखरेख ठेवण्यात येणार आहे. समुद्रातून येणार्‍या-जाणार्‍या बोटी, काही वेळा किनार्‍यावर वाहून येणार्‍या अथवा आढळणार्‍या संशयित वस्तू अथवा व्यक्ती आणि कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास त्याची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात येणार आहे. किनारी सुरक्षेसाठी पोलिसांसोबत प्रशिक्षित मरीन होमगार्ड तसेच मत्स्य विभागाचे वार्डन पोलिसांच्या मदतीला असणार आहेत. समुद्र आणि किनारपट्टीवरील परिस्थितीची माहिती असलेल्या या यंत्रणेमुळे संशयास्पद हालचालींवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

टाइम्स स्पेशल

मालवण हा पर्यटनदृष्ट्‌या महत्त्वाचा किनारपट्टीचा भाग असून येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची तसेच मच्छीमारी व पर्यटन व्यवसायातील बोटींची ये-जा असते. त्यामुळे किनार्‍याची सुरक्षा, संशयित हालचालींवर नजर आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीची कार्यवाही यासाठी पोर्टा केबिन महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg