रत्नागिरी - दिनांक सात ऑगस्ट हा हरितक्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्म जयंती दिन शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव रत्नागिरी येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव, आसमंत फाउंडेशन पुणे आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीतील शाश्वतते करिता ब्लॅक सोल्जर फ्लाय संवर्धन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. आसिफ पागरकर आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सुवर्णा चौधरी तसेच प्रा. डॉ. मनोज घुघुसकर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
ब्लॅक सोल्जर फ्लाय (बिएसएफ) म्हणजे काळी सैनिकी माशी. ही स्थानिक माशी असून पर्यावरण पूरक आहे. या माशीच्या संवर्धनाचे तंत्रज्ञान डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. मनोज घुगुसकर यांनी विकसित केलेले असून त्याच्या चाचण्या सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत. या माशी चा उपयोग करून दैनंदिन जीवनात तयार होणारे ओला कचरा तसेच सेंद्रिय पदार्थ जलदरीत्या विघटन करून त्यापासून खत निर्मिती केली जाते. गांडूळ खतापेक्षा जलद रीतीने ही खत निर्मिती असल्याने विविध देशांमध्ये घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणी या माशीचा उपयोग प्रदूषण नियंत्रण जैविक पद्धतीने करण्याकरता केला जातो. शेतीत निर्माण होणारा जैविक कचरा सुद्धा या माशीच्या सहाय्याने विघटन करून खत निर्मिती केली जाते. या माशीच्या अळ्या पशु आणि पक्षांकरिता उत्तम खाद्य म्हणून केला जातो . विद्यापीठाने निर्मिती केलेले हे तंत्रज्ञान पर्यावरण पूरक असल्याने त्याचा उपयोग शाश्वत शेतीमध्ये केला जाऊ शकतो.
प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता शिरगाव पंचक्रोशीतील महिला, जलजीविकाचे प्रकल्प व्यवस्थापक आणि विद्यार्थी उपस्थित होते . डॉ मनोज घुगुसकर यांनी उपरोक्त तंत्रज्ञान अतिशय सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा पद्धतीने सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे सर्व प्राध्यापक यांनी कष्ट घेतले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.