दापोली (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ’कृषी स्नेही’ समूहातर्फे वणोशी तर्फ पंचनदी येथे भात रोपांच्या मुळावर अझोटोबॅक्टरद्वारे अंतरक्षीकरणाचे यशस्वी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या मार्गदर्शक उपक्रमास परिसरातील १२ शेतकरी उपस्थित होते. २०० ग्रॅम अझोटोबॅक्टर कल्चर २ लिटर स्वच्छ पाण्यात मिसळून द्रावण तयार करण्यात आले. निरोगी भात रोपांची मुळे स्वच्छ पाण्याने धुऊन तयार द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून अंतरक्षीकरण करण्यात आले. प्रक्रियेनंतर ही रोपे मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना शेतकर्यांना अझोटोबॅक्टर या जैवखताचे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले. यात प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. पिकाच्या मुळांच्या वाढीस मिळणारी चालना आणि अन्नद्रव्यांचे वाढलेले शोषण. जमिनीची सुपीकता सुधारणे व रासायनिक नत्र खतांच्या वापरात होणारी बचत. अझोटोबॅक्टरची योग्य साठवणूक, वापरण्याची शास्त्रीय पद्धत आणि घ्यावयाची काळजी. या प्रात्यक्षिकामुळे शेतकर्यांना भात रोपांच्या मुळांवर अझोटोबॅक्टर प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. या पर्यावरणपूरक, शाश्वत व किफायतशीर तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्याबाबत शेतकर्यांमध्ये मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ’कृषी स्नेही’ समूहातील श्रावणी मोरे, साक्षी लोके, समृद्धी जाधव, तन्वी नादिवडेकर, कोमल झिरवाळ, आकांक्षा गाडगे, नीलम मदने, सलोनी सावंत, श्रुती बोबडे व अंकिता मुंज यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. विरेश चव्हाण तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.