loader
Breaking News
Breaking News
Foto

रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एल. पी. हायस्कूलमध्ये समाजोपयोगी उपक्रम

खेड : शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त येथील एल. पी. हायस्कूल येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, समाजकल्याण सभापती यश खेडेकर आणि नगरसेविका आरती पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला नगराध्यक्षा माधवी बटाला, गटनेते निकेतन पाटणे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, महिला शहरप्रमुख नेहा दळी, युवासेना शहरप्रमुख मयुरेश दरेकर, महिला व बालकल्याण सभापती रसिका खेडेकर, नगरसेवक संजय मोदी, नगरसेवक मिनार चिखले यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg