loader
Breaking News
Breaking News
Foto

अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राजीनामा द्यावा, अभिजीत दिपके यांचा नव्याने थेट आरोप

नवी दिल्ली - कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज गुरुवारी पुन्हा केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, २० जुलै रोजी संसद चलो आंदोलनादरम्यान निघालेल्या विद्यार्थी मार्चवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली त्यामुळे शहा यांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचे त्यांनी समर्थन केले. छत्रपती संभाजीनगर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. नीट पेपरलीक हे लोकशाहीमध्ये घातक असून सरकार विरोधकांना टार्गेट करीत आहे. हा विरोधकांचा प्रश्न नाही जनतेचा आहे आणि या प्रश्नाला जनतेलाच लढा द्यावा लागेल. त्यांनी नव्यानेच जबाबदारी घेतलेले प्रल्हाद जोशी यांना देखील टार्गेट केले. केंद्र शासनाने विद्यार्थी हल्ल्यामागे कोण आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी करुन अमित शहा यांचा राजीनामा त्वरीत घेण्यात यावा, असे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg