खेड (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या धर्तीवर जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी खेड, जिल्हा रत्नागिरी येथे भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. गृह राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य योगेश दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विविध योजनांच्या माहिती फलकांसह स्टॉल उभारण्यात आले होते. एकूण १६ शासकीय विभागांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. संबंधित विभागांच्या तालुका विभागप्रमुखांनी उपस्थित राहून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना दिली. मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे विविध शासकीय योजनांमध्ये मंजूर झालेल्या लाभांचे ३० लाभार्थ्यांना प्रतिनिधी स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये धनादेश, प्रशस्तीपत्रे, जातीचे दाखले, घरकुलाच्या चाव्या, डिजिटल ७/१२ उतारे तसेच स्मार्ट कार्ड आदी लाभांचे वितरण करण्यात आले.
तद्नंतर उपस्थित मान्यवरांनी विविध शासकीय विभागांच्या स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे, ज्योति कदम, श्रेयाताई योगेशदादा कदम, पालेकर, पंचायत समिती सभापती, खेड; संजयराव कदम, माजी आमदार तथा शिवसेना उपनेते शशिकांत चव्हाण, शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन धाडवे, तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य, तसेच पंचायत समिती सदस्य आणि विविध गावांचे सरपंच यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय १६ विभागांचे तालुका विभागप्रमुखही कार्यक्रमास उपस्थित होते.
आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देतानाच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे आदिवासी मेळावा उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.