loader
Breaking News
Breaking News
Foto

नॅशनल हायस्कूल दापोली तर्फे क्षेत्रभेटीचे आयोजन

दापोली- मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीच्या वतीने क्षेत्रभेट उपक्रम अंतर्गत कोकण मर्चंटाइल बँक दापोली येथे क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. यात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत यांनी या क्षेत्रभेटीचे नियोजन केले. क्षेत्रभेटी दरम्यान बँकेचे शाखा प्रबंध श्री अब्दुल समद ठेणकर यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधत बँकेची प्रणाली जाणून घेतली. श्री ठेणकर यांनी मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दिली. विद्यार्थ्यांना बँकेची प्रणाली व व्यवहार ज्ञान प्रत्यक्षरीत्या माहित व्हावी, हा उद्देश लक्षात घेऊन या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी सांगितले. या प्रसंगी रेशमा जोगीलकरसह सर्व स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचे व उपस्थित शिक्षकांचे स्वागत केले. या समयी प्रशालेचे शिक्षक रिजवान मणियार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg