देवगड(प्रतिनिधी)- जिल्ह्यातून बाहेर जाणारा तरुणांचा लोंढा थांबवण्याची खरी ताकद सहकारामध्ये आहे. ग्रामीण भागातील विकास सहकारी संस्थानी आपली जबाबदारी स्वीकारून साथ दिल्यास आदर्श सहकार उभा करून सहकाराची एक नवी ओळख महाराष्ट्रात निर्माण करू, असे ठोस प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी देवगड येथे केले.
देवगड येथील इंद्रप्रस्थ सभागृहात देवगड तालुक्यातील शंभर टक्के कर्जवसुली करणार्या १४ विकास सहकारी सोसायट्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, गजानन गावडे, संदीप साटम, मकरंद जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, राजा भुजबळ तसेच बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, संचालक, सचिव आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनीष दळवी म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. पाच वर्षांपूर्वी बँकेचा व्यवसाय सुमारे चार हजार कोटी रुपयांचा होता. आज तो जवळपास आठ हजार कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचत आहे. ही वाढ केवळ बँकेची नसून जिल्ह्यातील शेतकरी, विकास सोसायट्या, कर्जदार आणि संचालक मंडळ यांच्या विश्वासाची आणि प्रामाणिकतेची पावती आहे.’’ ते पुढे म्हणाले की, ‘‘जिल्ह्यातील २२८ विकास सहकारी सोसायट्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा बँक सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रत्येक विकास सोसायटीने गावातील शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजक यांना योग्य वेळी कर्ज उपलब्ध करून देत त्यांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावला पाहिजे.’’
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.