loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड न.प. चे निवृत्त कर्मचारी पाथरे यांच्या आषाढीवारीची ६२ वर्षे पूर्ण

खेड - खेड येथील नगरपरिषदेचे निवृत्त कर्मचारी, वरिष्ठ वसुली लिपिक परशुराम अनंत पाथरे यांच्या पंढरपूरच्या आषाढीवारीची ६२ वर्ष पूर्ण झाली आहेत, या आषाढीवारीची सुरुवात करताना त्यांची आतेमामी धामणस्कर यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली. तसेच त्यांच्यासमवेत आषाढीवारी करणार्‍या खेड न.प. चे निवृत्त कर्मचारी मनोज शिरगावकर यांना १३ वर्षे, महेंद्र शिरगावकर यांना ३ वर्षे तसेच संगमेश्वरचे बाळा शेट्ये यांना १३ वर्षे झाली आहेत. पालखी सोहळा दिंडी क्रमांक १२ या दिंडीचे मालक मारुतीबुवा कराडकर यांच्या दिंडीतून वारीला त्यांनी सुरूवात केली. ती आजतागायत पंढरपूरची आषाढीवारी सुरू आहे. काही वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा दिंडी क्र. १२ यासाठीचा ज्ञानेश्वरी पारायण सोहोळा परशुराम येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी परशुराम देवस्थानच तत्कालीन अध्यक्ष दिवंगत नाना जोशी व त्यांचे सहकारी दिवंगत हिराभाई बुटाला यांनी हा सोहोळा यशस्वी केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg