loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मोठा निर्णय, राजकीय घडामोडींना वेग

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मोठ्या राजकीय उलाढाल सुरू असून पक्ष अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. पक्ष धोरणाबाबत वैचारिक मांडणी करताना कोणतीही गफलत होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक हे रचना करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. आजपासूनच पक्षाची ध्येय धोरणे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पक्षाच्या सर्व प्रवक्ते पदाच्या नियुक्ती या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत असल्याची मोठी गोष्ट प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे या पुढील काळात नियुक्त्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडण्यासाठी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षहित आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर जहरी टीका केल्याने मोठी राजकीय प्रभू उडाली आहे ,काँग्रेसच्या टीकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. यानंतरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने प्रवक्ते पद रद्द करण्याचा तत्काळ निर्णय घेतल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg