loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर नगरपरिषदेत सफाई कर्मचारी दिन उत्साहात साजरा

राजापूर, दि. ३१ जुलै २०२६ : राजापूर नगरपरिषद, राजापूर यांच्या वतीने बॅ. नाथ पै सभागृहात सफाई कर्मचारी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, "राजापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच राजापूर नगरपरिषदेला 'माझी वसुंधरा अभियान' तसेच 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून, या यशाचे खरे श्रेय आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच जाते." यावेळी त्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सफाई कर्मचारी दिनानिमित्त सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सुप्रिया पोतदार यांनी केले. या प्रसंगी सन्मा.नगरसेवक श्री.महेश शिवलकर, कार्यालयीन अधीक्षक श्री.जितेंद्र जाधव, स्वच्छता निरीक्षक श्री.अमित पोवार, मुकादम श्री.राजन जाधव, श्री.सुशील यादव, श्री.संदेश जाधव, ऋतुजा जड्यार तसेच राजापूर नगरपरिषदेचे सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडला. उपस्थितांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg