loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा

दापोली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दापोली तालुक्यातील मळे वरची वाडी येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी मंजुषा कुद्रिमोती तसेच शैलजा पाटील उपस्थित होत्या, त्यांनी मार्गदर्शन केले. तर दाभोळ मंडल कृषी अधिकारी मंचरे यांनी माती परीक्षण आणि कृषी विभागातील विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची प्रस्तावना भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर यांनी केली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा तालुका उपाध्यक्ष किसन पांदे यांनी केले. यावेळी भाजपा चे तालुकाध्यक्ष सचिन होडबे, तालुका सरचिटणीस योगेश सुर्वे यांच्या उपस्थितीत भाजपा महिला मोर्चा तर्फे उपस्थित शेतकरी महिला भगिनींना कृषी साहित्य आणि परसबागेतील बियाण्यांचे वाटप करण्यात आले. भाजपाने आयोजित केलेल्या दापोलीतील या अनोख्या आणि सामाजिक कार्यक्रमाचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg