खेड - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी बैठकीत, अनुभवी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी शासकीय अधिकारी सी. आर. कांबळे यांची पक्षाच्या कोकण प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. चिपळूण येथील जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हस्ते सी. आर. कांबळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ, जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चेडे, जिल्हा पर्यावरण आघाडीचे सुरेंद्र तांबे, जिल्हा युवक अध्यक्ष प्रशितोष कदम, जिल्हा उपाध्यक्ष विजू आप्पा, मारुती मोहिते, चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ, गुहागर तालुका अध्यक्ष संदीप कदम, खेड तालुका अध्यक्ष बाबाराव पवार, तालुका सरचिटणीस जितेंद्र तांबे, दापोली-मंडणगड तालुक्यातील पदाधिकारी तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सी. आर. कांबळे हे शासकीय सेवेत प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी असून खेड तालुका कर्मचारी संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी एल.एल.बी. पदवी संपादन केली असून सध्या एल.एल.एम.चे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. अभ्यासू वृत्ती, प्रभावी वक्तृत्व, कुशल संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद ही त्यांची विशेष ओळख मानली जाते. समाजातील विविध घटकांशी असलेल्या त्यांच्या दृढ जनसंपर्काची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
सी. आर. कांबळे यांच्या नियुक्तीमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या कोकण प्रदेशातील संघटनात्मक कार्याला नवी गती मिळेल, पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचेल आणि नव्या कार्यकर्त्यांना सक्षम नेतृत्व लाभेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकार्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या नियुक्तीचे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातून उत्स्फूर्त स्वागत होत असून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच समाजबांधवांकडून सी. आर. कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.