loader
Breaking News
Breaking News
Foto

विकासाच्या गप्पा मारणार्‍या आम. दिपक केसरकर यांनी ‘हिरण्यकेशी’ येथे रविवारी भेट द्यावी एकनाथ नाडकर्णी यांची विनंती

दोडामार्ग(प्रतिनिधी)- सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा विकास केला अशा गप्पा मारणार्‍या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना आम. दिपक केसरकर यांनी येत्या रविवारी ९ ऑगस्ट रोजी इतर सर्व कामे बाजूला ठेवून आंबोली घाटमाथ्यावर असलेल्या हिरण्यकेशी धार्मिक पर्यटन स्थळी भेट देऊन पाहणी करावी, अशी जाहीर विनंती जिल्हा परिषद माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते एकनाथ अनंत नाडकर्णी यांनी केली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आम. दिपक केसरकर यांनी मतदारसंघात हजारो कोटी विकास निधी उपलब्ध करून, कामे मार्गी लावली, असे सांगत आहेत. मग सावंतवाडी तालुक्यातील आंबोली पर्यटनस्थळ म्हणून भारताच्या नकाशावर असलेल्या हिरण्यकेशी धार्मिक स्थळ दूर्लक्ष का? असा सवाल एकनाथ नाडकर्णी यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या हिरण्यकेशी येथील स्वयंभू महादेव तीर्थ क्षेत्र आहे. लाखो भाविक भेट देतात शिवाय पावसाळ्यात देखील मोठया संख्येने पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. आंबोली बेळगाव मुख्य रस्ता ते हिरण्यकेशी धार्मिक स्थळ ठिकाणी जाण्यासाठी काही वर्षापूर्वी केलेला रस्ता कुठे गायब झाला? संबंधित अधिकारी व आम. दिपक केसरकर याना माहीत, असे एकनाथ नाडकर्णी यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

हिरण्यकेशी येथे जाण्यासाठी रस्ता नाही. मोटार सायकल जाऊ शकत नाही. मोठया प्रमाणात खड्डे तसेच रस्ता अवस्था गटारव्यवस्था झाली आहे. पाणी वाहून चर पडले आहेत. चार चाकी वाहन जाऊ शकत नाही. मोटार सायकल अपघात वाढले आहेत, अनेक पर्यटक जखमी होत आहेत, रविवारी मोठया प्रमाणात गर्दी असते पण रस्ता नसल्याने आज हिरण्यकेशी गंभीर बाब बनली आहे. गेल्या दहा बारा वर्षात आम. दिपक केसरकर याना हिरण्यकेशी येथे विकास करावा, असे वाटले नाही. संबंधित रस्ता निर्माण बांधकाम विभाग अधिकारी यांना सुचले नाही. गोवा येथील काही पर्यटक रविवारी मंगळवारी आले. काही मोटार सायकल पर्यटक पडून जखमी झाले. त्यांना उचलून गाडीत घालून उपचारासाठी न्यावे लागले. इतकी भीषण अवस्था हिरण्यकेशी रस्त्याची झाली आहे. हाच विकास झाला. माजी जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते म्हणून सावंतवाडी मतदार संघाचे आम. दिपक केसरकर यांना आपली कळकळीची विनंती आहे. रविवारी आम. दिपक केसरकर यांनी इतर कुठे न जाता हिरण्यकेशी येथे भेट देऊन पाहणी करावी, असे एकनाथ नाडकर्णी यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg