loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर रत्नागिरी न. प. शाळा क्रमांक 19 आंबेशेत शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

रत्नागिरी (वार्ताहर) - श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक 19 आंबेशेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त या कार्यक्रमाच्या प्रारंभीस या शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे, विनय कांबळे, शुभम पेटकर उपशिक्षिका वर्षा म्हादे आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती. लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली. त्यानंतर आंबेशेत शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे उपशिक्षिका वर्षा म्हादे, उपशिक्षक विनय कांबळे, शुुभम पेटकर आदी शिक्षकांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg