मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्था व भाषा संचालनालयाच्या निधीतून आणि 'बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण' यांच्या वतीने येत्या २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मालवण येथे 'सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी या संमेलनाची संकल्पना 'युवा संमेलन: माझा काळ माझी भूमिका' अशी असणार आहे, अशी माहिती बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत साहित्यिक प्रवीण बांदेकर व ॲड. देवदत्त परुळेकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शैलेश खांडाळेकर, डॉ. ज्योती तोरसकर, ॲड. संदीप निंबाळकर, सौ. साटलकर, ॲड. पी. डी. देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून पुण्याचे प्रसिद्ध तरुण कादंबरीकार व वैचारिक लेखक श्रीरंजन आवटे उपस्थित राहणार असून, कोल्हापूर येथील गायिका व संत साहित्याच्या अभ्यासक रुचिका खोत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सेवांगणाचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर जबाबदारी सांभाळतील. २८ नोव्हेंबर रोजी भव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रा, सांस्कृतिक सत्रात स्थानिक कवींचे कवीसंमेलन, रुचिका खोत यांचा संगीतमय कार्यक्रम 'किर्तावणी' होईल. २९ नोव्हेंबर रोजी भव्य उद्घाटन सत्र होईल. महाराष्ट्रात विविध सामाजिक-वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ व साहित्यिक डॉ. रूपेश पाटकर यांची प्रकट मुलाखत डॉ. ज्योती तोरसकर व पराग गावकर हे घेतील. दुपारच्या सत्रात 'माझे लेखन आणि आजचे वर्तमान' या विषयावर विशेष परिसंवाद. राज्य पुरस्कारप्राप्त पुरोगामी विचारवंत ज्ञानेश्वर बंडगर, युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रदीप कोकरे, बीबीसी मराठीचे पत्रकार विनायक होगाडे आणि सरिता पवार हे सहभागी होतील. सायंकाळच्या सत्रात जिल्ह्यातील निवडक युवा कवींचे कवीसंमेलन होईल. त्यानंतर संमेलनाचा समारोप होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
गेल्या वर्षी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेले जिल्हा साहित्य संमेलन हे राज्यातील 'लक्षवेधी संमेलनां'पैकी एक ठरले होते. यंदाचे संमेलन हे तरुण पिढीचे वर्तमान, साहित्य, समाजकारण आणि राज्यकारण याविषयीचे मंथन घडवून आणणारे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमी, नागरिक व युवा - तरुण वर्ग, विद्यार्थ्यांनी या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.